-
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दोन वेगवेगळ्या सापळ्यात मध्ये कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या ३ कर्मचाऱ्यांना अटक, भ्रष्टाचारात हाफ सेंच्युरी आकडा पार होणार ।

डोंबिवली :- महाराष्ट्रात संगणक प्रणाली असणारी एकमेव महापालिका मात्र सध्या कल्याण डोंबिवली महानगर पालिका भ्रष्टाचाराची बजबजपुरी म्हणून विख्यात असून आजमिती पर्यंत पन्नास हून अधिक लाचखोर अधिकारी व कर्मचार्या लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. कठोर कारवाई यंत्रणा व्दारे होत नसल्याने भ्रष्टाचाराचे प्रकरणे वाढतच आहे आता आकडा अर्धा शतक पर्यंत पोहचला आहे
गुरुवारी ठाणे लाचलुचपत विभागाने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या दोन वेगवेगळ्या विभागात ट्रॅप लावून तीन जणांना लाच स्वीकारताना अटक केली या मध्ये आरोग्य विभागातील दोन जण व मलनिस्सारण विभागातील एकाला लाच प्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केल्याचा धक्कादायक घटना घडली. कल्याण डोंबिवली मनपाच्या स्थापनेपासून आतापर्यंत ४७ हून अधिक अधिकारी, कर्मचारी लाच प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. घनकचरा विभागातील आरोग्य निरिक्षक वसंत देगलूरकर ,आणि सहकारी सुर्दशन जाधव या दोघांना आजारी असलेल्या कर्मचाऱ्याकडून परत कामावर रुजू करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले ,तर कल्याण डोंबिवली मलनिस्सारण विभागाचे सहाय्यक अभियंता रवींद्र अहिरे, यांनी एका विकासाला एनओसी देण्यासाठी ४० हजार रूपयांची लाच प्रकरणी रंगेहाथ अटक केली. या दोन लाचलुचपत विभागाच्या सापळ्याच्या जाळ्यात तीन जण अट कल्याने पलिका वर्तुळात सन्नाटा पसरला होता ।