कॉलेज तरुणीचा पाठलाग करणाऱ्या युवकाविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल – आरोपी अटकेत ।

  • कॉलेज तरुणीचा पाठलाग करणाऱ्या युवकाविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल – आरोपी अटकेत ।

 

प्रमोद कुमार 

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आर पी स्वामी राठोड वय १९ वर्ष याने गेल्या चार – पाच महिन्यापासून पीडीतेचा कॉलेजपर्यंत पाठलाग करून, नकार दिल्यास हाताची नस कापून घेण्याची धमकी दिली होती. दरम्यान अशी तक्रार पीडित मुलीच्या पालकांनी दिली होती. याप्रकरणी २३ जुलै २०२५ रोजी गु.र.नं.५५५/२०२५ अन्वय भा.न्या.स.कलम ७८(२) आणि लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पॉक्सो) कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून,त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास डोंबिवली विभागाचे सह सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ।