आगामी महापालिका निवडणुकीत टीम ओमी कलानीचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा ।

  • आगामी महापालिका निवडणुकीत टीम ओमी कलानीचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा।
उल्हासनगर : शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांची युती अबाधित आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यात *दोस्ती का गठबंधन* जाहीर करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरात भेट दिली. यावेळी टीम ओमी कलानीचे सर्वेसर्वा ओमी कलानी आणि त्यांच्या सदस्यांना पेढा भरवत आनंद व्यक्त करण्यात आला. आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीम ओमी कलानीचा तब्बल १५ नगरसेवकांसह शिवसेनेला जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी ओमी कलानी यांनी स्पष्ट केले. तसेच आगामी निवडणुका शिवसेना समवेत एकत्रित लढण्याची इच्छा ही यावेळी ओमी कलानी यांनी व्यक्त केली.