- कल्याणच्या बल्याणी परिसरात केबीके इंटरनॅशनल स्कूलची संरक्षण भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू तर दोन मुलं जखमी ।
- शाळे शेजारील चाळीच्या परिसरात खेळत असलेल्या मुलावर भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू तर दोन मुलं जखमी ।

डोंबिवली :- कल्याण नजिकच्या आंबिवलीतील बल्याणी येथील झोपडी परिसरातील केबीके इंटरनँशनल खाजगी शाळेची भिंत कोसळल्याची घटनेत एका लहान मुलांचा मुत्यू तर दोन लहान मुले गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली.त्यामुळे अनधिकृत बैठ्या चाळींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे । टिटवाळा कल्याण ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बल्याणी परिसरातील एस के नगर जवळील केबीके इंटरनँशनल या खाजगी शाळेची धोकादायक अवस्थेत असलेली संरक्षक भिंत शुक्रवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास कोसळली .शाळेची भिंत च्या लागूनच शाळे शेजारील श्री कुपा चाळ आल्याने या चाळ आणि भीतीच्या जागेत परिसरातील लहान मुले खेळत होती. अचानक पने या खेळणाऱ्या मुलाच्या अंगावर कोसळल्याने, अंशुकुमार सिंह ११ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मुत्यू झाला .तर १० वर्षीय मुलगा अभिषेक साहानी , आणि ६ वर्षीय शोएब शेख हे गंभीर जखमी झाले. दोन्ही मुलावर रूग्णालयात उपचार सुरू असून घटनेत अंशुकुमार सिंह यांचा दुर्दैवी मुत्यू झाल्याचे रूक्मिणीबाई रूग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेने बल्याणी परिसरातील केबिके शाळेजवळील चाळ परिसरात शोककळा पसरली. स्थानिक चाळकरी रहिवाशांनी यानिमित्ताने आरोप केला की, केबिके शाळेची संरक्षण भिंत धोकादायक झाली होती.या बाबत शाळाप्रशासनाला तक्रार केली होती. मात्र शाळा प्रशासनाने थातुरमातुर डागडुजी करीत दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली. या घटनेने खाजगी शाळा इमारत बांधकाम ,संरक्षण भिंत प्रश्न ऐरणीवर आला आहे. अ” प्रभाग राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीर चाळीचे चाळे टिटवाळा ,आंबिवली , वडवली , बाल्याणीं, उंबरळीं मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे आर्थिक उलाढाल मोठी असल्याने सर्व बिनदिक्कत पणे बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे परिणामी घटना चे प्रमाण ही वाढले आहे।
Post Views: 296