कल्याण डोंबिवली परिसरात विकास कामाची साखळी, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या १८ मे रोजी हस्ते उद्घाटन ।

  • कल्याण डोंबिवली परिसरात विकास कामाची साखळी, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या १८ मे रोजी हस्ते उद्घाटन ।

डोंबिवली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील विविध विकासकामाचे उद्घाटन आणि भूमिपूजन १८ मे २०२५ रोजी होणार आहे. या कामामुळे परिसरातील नागरिक सुविधा अधिक सक्षम होणार असून, नागरिकांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या पूर्णत्वास जाणार आहे. यामध्ये डोंबिवलीतील घारडा सर्कलचे नामांतरण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आश्रारुढ पुतळा येथे उभारण्यात आला आहे. मानपाडा येथे खासदार डॉ. शिंदे यांच्या पुढाकारातून खेळण्यासाठी सुविधा युक्त क्रीडा संकुलन उभारण्यात येणार आहे. तसेच, रिंग रोड टप्पा २ अंतर्गत बाधित नागरिकांना नवीन सदनिकाचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. बी .एस .यू .पी प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसन, कल्याण पश्चिम मध्ये व्ही.बी.चौक ,सेंट लॉरेन्स स्कूल समोर, वाडेकर उंबर्डे येथे उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या नियंत्रणाखाली साय.४ वा. दरम्यान उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते होणार असून , महिला पोलीस कर्मचाऱ्यांना(दामिनी पथक) दुचाकीचे वाटप अशी अनेक लोक उपयोगी कामे यावेळी पूर्ण होणार आहे. तसेच, आरक्षण क्र.४५ येथे नव्याने उभारण्यात आलेल्या उद्यानाचे लोकार्पण होणार आहे. या सोबतच शहर स्वच्छता, वारसा जपणारे पुतळे उभारणी, सौंदर्यकरण अशा विविध उपक्रमाचे साखळी सुरू करण्यात आली आहे. या सर्व कामामुळे कल्याण डोंबिवली परिसरात चेहरा बदलणार असून, नागरी जीवनात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडणार आहे.