जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार विकास निधीमधून
रु. 39 लाख खर्च करून वाशी विभागातील जुहू चौपाटी व से-15ए टाईप अपार्टमेंट असोसिएशन परिसरात लावण्यात आलेल्या सी.सी.टीव्ही. कॅमेरे उद्घाटन संपन्न ।

प्रमोद कुमार
नवी मुंबई :- खासगी मनोरंजन वाहिनीवर एका कार्यक्रमातील स्पर्धकांवर ज्या पद्धतीने चारही बाजूने सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवत त्यांच्या कार्याचे मूल्यांकन केले जात आहे. त्याच पद्धतीने *“जागतिक महिला दिनाचे” औचित्य साधून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार विकास निधी मधून रक्कम रु. 39 लाख खर्च करून वाशी विभागातील जुहू चौपाटी व सेक्टर 15 ए टाईप अपार्टमेंट असोसिएश परिसरात मधील परिसरात तब्बल 23 सीसीटीव्ही कॅमेरेंचा उद्घाटन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्फत नवी मुंबईमध्ये होत असलेल्या विविध विकास कामांचा धूमधडाका पाहून बेलापूर मतदारसंघामध्ये सलग तिसऱ्यांदा आमदार पदी निवडून आल्याबद्दल वाशी विभागातील रहिवासी यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांचा “नागरी सत्कार” करण्यात आला.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, संपूर्ण नवी मुंबई शहर देखील सी.सी.टीव्ही कॅमेरेच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत येण्यासाठी नवी मुंबईमध्ये माझ्या आमदार निधी मधून ठिकठिकाणी सी.सी.टीव्ही. कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच रहदारीच्या मुख्य चौकांमध्ये कॅमेरे देखील लावले आहेत. तसेच नवी मुंबईमध्ये माझ्या आमदार निधी मधून विविध प्रकारच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन होत आहेत. त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाचे काम अर्थातच शहरभरात सी.सी.टीव्ही.कॅमेरे लावण्याचे काम हाती घेऊन ते पूर्ण हि केले आहेत. यामुळे संपूर्ण शहर तिसऱ्या डोळ्याच्या कक्षेत आला असून छोट्या- मोठ्या प्रत्येक घटना, घडामोडी सी.सी.टीव्ही.कॅमेऱ्यात कैद होणार आहेत. इतकेच नाही तर गुन्हेगारीस देखील आळा बसण्यास मदत होणार आहे. त्यानिमित्ताने सी.सी.टीव्ही. कॅमेरे बसविण्याच्या कामांना वेग आला आहे. बहुतांशी मुख्य चौक, भागात कॅमेरे बसविण्यात आले असून या सर्व कॅमेऱ्याचे कंट्रोल वाशी पोलीस स्टेशनच्या ताब्यात असणार आहे. त्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलिस विभागास विविध घटना घडामोडी यावर नजर ठेवता येणे शक्य होणार आहे. याशिवाय रस्त्यावर महिलांची छेडखानी, गर्दीची संधी साधत होणारी लूटपाट अशा विविध घटनांना पायबंद घालण्यास मदत होणार आहे. तसेच विविध भागात कॅमेरे बसविण्यात आले असून संपूर्ण शहरभर विविध ठिकाणी मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरेची नजर असल्याचे बघावयास मिळणार आहे. या माध्यमातून दुचाकींसह विविध प्रकारच्या वाहनांची तसेच इतर अनेक प्रकारच्या चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. या तिसऱ्या डोळ्यामुळे नागरिकांना शहरात बिनधास्तपाने वावरता येणार आहे. यामुळे नागरिकांकडून या उपक्रमांबाबत वाशी विभागातील नागरिकांकडून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक होत असून नागरिक त्यांचे आभार मानत समाधान व्यक्त करीत आहेत. याप्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक राजू शिंदे, विकास सोरटे, अहमद शेख (पाशा भाई), विक्रम पराजुली, मुकुंद विश्वासराव, प्रवीण भगत, मंगेश चव्हाण, जेम्स आवारे, श्रीराज भाई, जयंत पाटील, प्रदीप करिया, रमेश चौधरी, मालती सोनी, राखी पाटील, क्षितिजा घोरपडे, सुमा रणजीत, तसेच भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ।
Post Views: 75