राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कल्याणमध्ये विद्युत सुरक्षेसंदर्भातील चर्चासत्राचे आयोजन – नागरिकांना दक्षता व सावधगिरीचा संदेश ।

  • राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कल्याणमध्ये विद्युत सुरक्षेसंदर्भातील चर्चासत्राचे आयोजन – नागरिकांना दक्षता व सावधगिरीचा संदेश ।

प्रमोद कुमार 

डोंबिवली : पावसाळ्यात विद्युत साहित्य हाताळताना सावधान राहावे लागते आणि नियमांचे पालन करावे लागते. सध्याच्या काळात इलेक्ट्रिक वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर लक्षात घेता,केवळ विद्युत कर्मचाऱ्यांनीच नव्हे तर सामान्य नागरिकांनीही अधिक जागरूक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित चर्चासत्रात करण्यात आले. हे चर्चासत्र कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये संपन्न झाले. या सत्रात कल्याण,ठाणे, भिवंडी, उल्हासनगर येथील महापालिकेचे कार्यकारी अभियंता, विद्युत कर्मचारी, कंत्राटदार तसेच महापालिकेचे विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध तज्ञांनी विद्युत सुरक्षेचे महत्व अधोरेखित करताना सांगितले की, विजेशी संबंधित काम करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक वेळा किरकोळ चुका मोठ्या अपघाताचे कारण बनतात. इमारतीच्या फायर फायटर यंत्रणाची स्थिती, पॅनल तपासणी, आरसीसीबी उपकरणाची गरज,एफआरएलएसएच   केबल्सचे महत्व,आर्थिंगसारख्या तांत्रिक बाबीवरही या वेळी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.घरातील वायरिंगकडे दुर्लक्ष केल्याने निर्माण होणाऱ्या धोक्याबाबतही नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.भारत सरकारने नव्याने लागू केलेल्या सेंट्रल इलेक्ट्रिक  ऍक्टमधील महत्वाच्या तरतुदीविषयी माहिती देण्यात आली. महाराष्ट्र शासनाचे विद्युत निरीक्षक आर. आर. यादव, सह निरीक्षक भूषण माणकामें,जाधव यांच्या सह विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे लेखापरीक्षक लक्ष्मण पाटील,शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव,राष्ट्रीय उत्पादकता परिषदेचे माजी संचालक टी.शंकर नारायण,कार्यकारी अभियंता यशवंत पाटील,व राजू राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त नागरिकांना संदेश देण्यात येत आहे की,”शॉक सांगून लागत नाही,म्हणून नेहमी विद्युत सुरक्षेला महत्व द्या.या सप्ताह निमित्ताने देण्यात येत आहे ।