कल्याण पश्चिमेतील उबाठा पक्षातील पदाधिकारी युवा कार्यकर्त्यांचा आणि महिला आघाडी यांचा शिवसेनेत प्रवेश ।

  • कल्याण पश्चिमेतील उबाठा पक्षातील पदाधिकारी युवा कार्यकर्त्यांचा आणि महिला आघाडी यांचा शिवसेनेत प्रवेश ।

प्रमोद कुमार

डोंबिवली : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी हळूहळू वेग घेतल्याचे दिसत आहे. त्याच एक भाग म्हणून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा चिटणीस उदय रकीबे, युवासेना विभाग अधिकारी भरत भाटी, युवासेना उपविभाग अधिकारी ऋषिकेश आव्हाड, रंजना सांगळे, कविता सांगळे, उज्वला सांगळे, अनिता बोधले, केतकी वैद्य, हर्षाली बोधके, प्रियांका सांगळे यांच्यासह युवासेना पदाधिकारी, महिला आघाडी कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. आमदार विश्वनाथ भोईर साहेब, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे साहेब, आणि शहरप्रमुख रवी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला । राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि युवा खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन या सर्वांनी पक्षप्रवेश केला आहे. निवडणुका आल्या म्हणून हे प्रवेश झालेले नसून आमच्या पक्षाच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन हे पक्षप्रवेश सुरूच असल्याची प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी यावेळी दिली. तर येत्या काळात अनेक मोठमोठाले पक्षप्रवेश येत्या काळात होणार असल्याचे सूचक वक्तव्यही आमदार भोईर साहेब यांनी यावेळी केले । यावेळी आमदार विश्वनाथ भोईर साहेब, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे साहेब, शहरप्रमुख रवी पाटील साहेब, उपनेत्या सौ.विजयाताई पोटे, महिला जिल्हा संघटक सौ.छायाताई वाघमारे, महिला शहर संघटक सौ.नेत्राताई उगले, युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव प्रतीक पेणकर युवासेना भिवंडी लोकसभा विस्तारक सुजित डामरे, युवासेना शहर प्रमुक सुजित रोकडे, दिनेश निकम, शिवसेना विधानसभा सहसंघटक यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ।