- छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीसह बैठकरूपी पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य असा अनावरण सोहळा संपन्न ।

प्रमोद कुमार
डोंबिवली : डोंबिवलीतील मानपाडा रोड येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या परिसरात बहुप्रतिक्षित “छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीसह बैठकरूपी पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य असा अनावरण सोहळा” संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात पोवाडा गायन, देशभक्तिपर गीतसंगीत, शौर्यप्रदर्शन तसेच पारंपरिक ढोल-ताशा वादन यांचा समावेश होता. या वेळी सुप्रसिद्ध गायक अभिजित जाधव आणि आमु जाधव यांनी संयुक्त सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांचे सादरीकरण कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सर्व डोंबिवलीवासियांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
यावेळी भाजपा आमदार रवींद्र चव्हाण, सौ.सुलभा गायकवाड, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे , शिवसेना वरिष्ठ नेता गोपाल लांडे ,वरिष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, जनार्दन म्हात्रे , संगीता मुकेश पटिल, राजेश कदम , विवेक खामकर च्यासह कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ।
Post Views: 364