- कल्याण विभागात पोलिसांच्या वतीने रुटमार्च ।

डोंबिवली : कल्याण परिमंडळ ३ हद्दित गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या अनुशंगाने कल्याण विभागात पोलिसांच्या वतीने रुटमार्च आयोजित करण्यात आला होतं. हा रूटमार्च महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दितील काळी मशिद चौक येथुन सुरु होऊन पुढे सहजानंद चौक, छत्रपति शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दित प्रवेश करून शंकरराव चौक, अत्रे रंग मंदीर, गांधी चौक, जुने बाजारपेठ पोलीस स्टेशन कोकण मर्कंटाईल बॅंक, दुधनाका-विजय लॉन्ड्री, पारनाका टिळक चौक, अहिल्याबाई चौक, मोहिंदर काबुलसिंग चौक, लाल चौकी, दुर्गा माता चौक मार्गे गणेशघाट विसर्जनस्थळी ठिकाणी समाप्त करण्यात आला. या रूटमार्च मध्ये पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्यासह ४ वपोनि, २१ पीएसआय, ११० पोलिस अंमलदार, १ एसआरपी प्लॅटून, २ सेक्शन आणि ४ पीटर मोबाईल, ४ सीआरएम मोबाईल, ४ पीसीआर मोबाईल, १ स्ट्राइकिंग मोबाईल सहभागी झाले होते ।
Post Views: 28