शिवसेनेतर्फे कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला कल्याणकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ।

  • शिवसेनेतर्फे कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला कल्याणकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ।
प्रमोद कुमार 
डोंबिवली : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचे कंबरडे मोडले. भारतीय सैन्याच्या या शूर पराक्रमाच्या सन्मानार्थ शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने तसेच कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेतर्फे कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला कल्याणकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आपल्या भारतीय सशस्त्र दलाने #OperationSindoor च्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. या ऑपरेशनदरम्यान भारतमातेच्या वीरपुत्रांनी दाखविलेल्या शौर्य, संयम आणि बलिदानाच्या सन्मानार्थ ही तिरंगा रॅली संपन्न झाली । आम्ही सर्व देशबांधव ऑपरेशन सिंदूर सोबत आहोत हे दर्शवण्यासाठी कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर साहेब, कल्याण शहर प्रमुख रवी पाटील साहेब यांच्या नेतृत्वात कल्याण पश्चिम येथे तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती । ही बाईक रॅली कल्याण शहरामध्ये किल्ले दुर्गाडी मंदिर दुर्गादेवीची आरती करून पुढे मार्गस्थ आधारवाडी- खडकपाडा- भवानी चौक- कल्याण स्टेशन दिपक हॉटेल- हॉटेल पुष्पराज- छत्रपती शिवाजी महाराज चौक-शंकराव चौक-गांधी चौक- पारनाका- लालचौकी- आग्रा रोड- छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न झाली. यावेळी भारत माता की जय आणि भारतीय सैन्याचा विजय असो अशी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली । या रॅलीमध्ये विधानसभा संघटक/मा.नगरसेवक प्रभुनाथ भोईर, उपशहर प्रमुख / मा.नगरसेवक सुनील वायले, मा.नगरसेवक जयवंत भोईर, गणेश जाधव, उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड, युवासेना भिवंडी लोकसभा विस्तारक सुचेत डामरे, युवासेना शहर प्रमुख सुजित रोकडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक तसेच असंख्य देशप्रेमी नागरिक सहभागी झाले होते।