कल्याण पश्चिमेचे कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा ।

कल्याण पश्चिमेचे कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा ।
प्रमोद कुमार
डोंबिवली : कल्याण प्रभाग क्रमांक २३ फ्लॉवर व्हॅली मधील जय संतोषी माता व न्यू श्रीकृष्ण दर्शन सोसायटी येथिल बंदिस्त गटारी व पाण्याची पाईप लाईन टाकणे बाबत कामांचा भूमिपूजन समारंभ कल्याण (प.) चे आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. विधानसभा निवडणुकीत मला खंबीर पाठबळ व भरगोस मतदान देणाऱ्या तमाम बेतुरकर पाडा परिसरातील नागरिकांचे आभार व्यक्त करत, बेतुरकर पाडा येथे आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणार अशी ग्वाही या वेळी आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी उपस्थित नागरिकांना दिली. याप्रसंगी शिवसेना उपनेत्या सौ.विजयाताई पोटे, शहर प्रमुख रवी पाटील साहेब, माजी नगरसेवक जयवंत भोईर, अरविंद पोटे, युवासेना भिवंडी लोकसभा विस्तारक सुचेत डामरे, सौ. गरूड मॅडम, युवासेना जिल्हा समन्वयक सुरज खानविलकर, शाखाप्रमुख रविंद चौधरी, चेतन म्हामुणकर, कोमल म्हामुणकर, उमेश झुटे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ।