माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या प्रभागात भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले ।

  • माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या प्रभागात भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले ।

डोंबिवली : माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या प्रभागात भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी जाहीर सभा घेण्यात आली,कार्यालयाच्या उद्घाटनाला माजी खासदार कपिल पाटील,माजी मंत्री जगन्नाथ पाटील,कल्याण पूर्वेच्या विद्यमान आमदार सुलभा गायकवाड,उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी,कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब,भाजपाचे नाना सूर्यवंशी,शशिकांत कांबळे, रेखा चौधरी, एपीएमसी मार्केट कल्याणचे उपसभापती जालिंदर पाटील,भाजपा ग्रामीण मंडळ सरचिटणीस भरत जाधव,आणि भाजपाचे अनेक आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रसंगी परिसरातील इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला । पिसवली परिसराची व्याप्ती मोठी असल्यामुळे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी भाजपाचे जनसंपर्क कार्यालय उभारले,त्यासाठी भाजपाचे वरिष्ट नेते आणि अनेक पदाधिकारी उपस्थित राहिले आणि भव्य स्वरूपात कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.त्या प्रसंगी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोरेश्वर भोईर यांच्या कार्याचा आढावा घेत जनतेला आवाहन केलं की जनतेने भारताच्या उज्वल भवितव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा.पिसवली परिसराचा विकास व्हावा यासाठी मोरेश्वर भोईर याच्यासारखा जनतेत मिसळणारा कार्यकर्ता पुढे यायला हवा.असे सांगून मोरेश्वर भोईर यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कपिल पाटील यांनी आपल्या छोटेखानी भाषणात पक्षाच्या ध्येयधोरणाचा उल्लेख करत देशासाठी भाजप सरकार असणे किती गरजेचे आहे हे सांगितले.मोरेश्वर भोईर यांनी आपल्या प्रभागातील विविध विकास कामांना प्राधान्य देत जनतेला आश्वासित करत, वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले ।