टोरेंट पॉवरने ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवींसाठी विनंती पत्रे पाठवली ।

  • टोरेंट पॉवरने ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवींसाठी विनंती पत्रे पाठवली ।

ठाणे: टोरेंट पॉवरने भिवंडीतील अनेक वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव विनंती पत्रे पाठवली आहेत. ग्राहकांना पाठवलेले हे अतिरिक्त सुरक्षा ठेव पत्र महावितरण आणि एमईआरसी पुरवठा संहिता नियम, २०२१ च्या प्रक्रियेनुसार आहे, असे टोरेंट पॉवरने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. वीज कायद्याच्या कलम ४७ नुसार ग्राहकांना वीज जोडणी मिळविण्यासाठी सुरक्षा ठेव भरणे बंधनकारक आहे. तसेच, MERC पुरवठा संहिता नियमावली, २०२१ नुसार, सुरक्षा ठेवीची रक्कम बिलिंग सायकल कालावधीच्या सरासरी बिलिंगच्या दुप्पट असेल. या नियमांतर्गत सरासरी बिलिंग निश्चित करण्यासाठी, मागील बारा (१२) महिन्यांचे सरासरी बिलिंग घेतले जाते. ज्या प्रकरणांमध्ये पुरवठा कमी कालावधीसाठी असतो, तिथे कमी कालावधीचे सरासरी बिलिंग घेतले जाते. नियमांमध्ये असेही म्हटले आहे की, कंपनी दरवर्षी, ज्या ग्राहकांकडे आधीच कनेक्शन आहे त्यांच्याकडून आवश्यक असलेल्या सुरक्षा ठेवीची रक्कम मोजेल. म्हणून, महावितरणच्या प्रक्रियेनुसार, टोरेंट पॉवरने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या ग्राहकांसाठी असलेल्या सुरक्षा ठेवीचा आढावा घेतला आहे आणि लागू असल्यास अतिरिक्त सुरक्षा ठेवीसाठी ग्राहकांना मागणी पत्रे पाठवली आहेत.पेमेंट सुलभतेसाठी, MERC नियम ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव सहा समान हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय प्रदान करतात.ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी भरलेली सुरक्षा ठेव महावितरणकडेच रहाते (टोरेंट पॉवरकडे नाही). तसेच, दरवर्षी ग्राहकांना या सुरक्षा ठेवीवर व्याज दिले जाते ।