शिवसेना मुंब्रा शहर पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली ।

शिवसेना मुंब्रा शहर पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली ।
ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब व शिवसेना उपनेते गुरुनाथजी खोत यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभा अंतर्गत मुंब्रा शहर पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली, ज्यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे उपाय, संघटन बळकटीसाठी नवे पदाधिकारी नेमणे आणि जनसेवेच्या उपक्रमांना अधिक प्राधान्य देण्याचे ठरले. तसेच, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून, गरज पडल्यास आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिवसेना हा केवळ एक राजकीय पक्ष नसून जनतेच्या हितासाठी लढणारी सामाजिक चळवळ आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट करत मुंब्रा शहराच्या विकासासाठी एकजुटीने पुढे जाण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. शिवसेना – जनतेचा आवाज, विकासाची गारंटी!