आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून नेरूळ येथे उभारण्यात आलेल्या “ओल्ड एज होम” चे लोकार्पण संपन्न ।
प्रमोद कुमार
नवी मुंबई:- आयुष्यामध्ये जीवनचक्रातील बालपण व म्हातारपण हे दोन टप्पे अतिशय महत्वपूर्ण असतात. ज्याप्रमाणे एखाद्या लहान बाळांच आपल्याला व्यवस्थित संगोपन कराव लागत, त्याची योग्य काळजी घ्यावी लागते त्याच प्रमाणे आपल्याला वृद्ध लोकांना देखील तितकंच जपावं लागतं. त्यांची योग्य ती काळजी घ्यावी लागते, त्यांना वेळेवर जेवण देणे, त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे, व त्यांना कधीही एकटेपणाची भावना जाणून न देता नेहमी त्यांच्या सोबत राहणे त्याचं मनोरंजन करत राहणे या सगळ्या गोष्ठी अतिशय महत्वपूर्ण ठरतात याच अनुषंगाने आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून नेरूळ सेक्टर 38, प्लॉट 13 येथे उभारण्यात आलेल्या “ ओल्ड एज होम” चे लोकार्पण आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वल करून करण्यात आले. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, “ओल्ड एज होम” म्हणजे आजकालच्या आधुनिक जमान्यात आवश्यक गोष्ट झाली आहे. तसेच विभक्त कुटुंब पद्धती आणि बदलणारा काल यामुळे “ओल्ड एज होम” काळाची गरज बनली आहे. अलीकडच्या काळात भारतातील पारंपरिक एकत्र कुटुंब पद्धती लोप पावून विभक्त कुटुंब पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची संख्याही वाढत आहे. छोटी छोटी कुटुंबे निर्माण झाल्याने आई-वडिलांवर एकाकी राहण्याची वेळ आली आहे. मुला-मुलींनाही स्वत:च्या आईवडिलांची जबाबदारी नकोशी वाटते. त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात पाठविण्याचा विचार वाढायला लागला असून ज्येष्ठ नागरिकांना या “ओल्ड एज होम” चा एक आधार मिळाला आहे. तसेच या “ओल्ड एज होम” च्या भूखंडाकरिता आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने सिडको महामंडळाकडून कमी दरात महापालिकेला भूखंड उपलब्ध करून दिला. त्याच बरोबर अधिवेशनामध्ये “लक्षवेधी” ही मार्फत शासनाचे लक्ष वेधले होते. तसेच त्या पुढे म्हणाले की, प्रत्येकाला आपल स्वातंत्र्य आणि छोटसं घर हव आहे आणि ह्या छोट्याशा घराच्या कल्पनेमध्ये बहुतांश लोक आपल्या आई-वडिलांचा समावेश करायला विसरतात आणि म्हणूनच वृद्ध झालेल्या आई-वडिलांकडे फक्त मार्ग उरतो तो म्हणजे “ओल्ड एज होम”. आई-वडिलांच्या आपल्या मुलांकडून फार अपेक्षा असतात आणि याच अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादामध्ये मुलांची चिडचिड होते आणि त्याचं जगणं अतिशय अवघड होत जात आणि म्हणूनच ते आपल्या आयुष्यातील अपयशाला आई-वडिलांना जबाबदार ठरवतात. पूर्वी आई-वडिलांचे आशीर्वाद हे सर्वश्रेष्ठ मानले जायचे परंतु हल्ली बदलत्या काळाबरोबर समाजामध्ये अनेक बदल घडले आणि माणसाच्या भावना देखील बदलल्या. तसेच “ओल्ड एज होम” हे एका प्रकारचे घर असतं इथे वृद्धांना सव सोयी पुरविल्या जातात. अतिशय स्वच्छता असते तसेच, त्यांच्या खाण्यापिण्याच्या व राहण्याची सोय केली जाते. शिवाय “ओल्ड एज होम” मध्ये वृद्ध लोक त्यांच्या वयाच्या लोकांसोबत बसून त्यांच्याशी बोलू शकतात, त्यांचाशी गप्पा मारू शकतात, आपल्या मनातल्या गोष्ठी बोलू शकतात, खेळ खेळ खेळू शकतात आणि सुखाची व दु:खाची देवाण घेवाण करू शकतात. “ओल्ड एज होम” मध्ये येणारे प्रत्येक वृद्ध व्यक्ती आपल्या मनापासून कधीच “ओल्ड एज होम” चा मार्ग निवडत नाही परंतु काही कारणास्तव त्यांना हा मार्ग निवडावा लागतो तर काही लोक स्वत:हून “ओल्ड एज होम” मध्ये येतात तर काहींचे मुलंच आपल्या आई-वडिलांना “ओल्ड एज होम” मध्ये पाठवतात. आज याच “ओल्ड एज होम” चे लोकार्पण झाल्याने नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निमार्ण झाले असून आमदार मंदाताई म्हात्रे कौतुक होत आहे. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे, मुंबई प्रादेशिक ज्येष्ठ नागरिक महासंघ अध्यक्ष सुरेश पोटे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष सी.व्ही.रेड्डी, डॉ. राजेश पाटील, कमल शर्मा, प्रभाकर कांबळे, बळवीरसिंग चौधरी, राजू तिकोने, जयवंत तांडेल, पांडुरंग आमले, संजय ओबेरॉय, अजय सिंग, अजय वर्मा, आरती राउळ, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपायुक्त समाजविकास विभाग किसनराव पलांडे, सहाय्यक आयुक्त बेलापूर डॉ. अमोल पालवे तसेच ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष पदाधिकारी व समाजविकास विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.