धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिरामुळे अंबरनाथची नवी ओळख निर्माण होणार

  • धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिरामुळे अंबरनाथची नवी ओळख निर्माण होणार
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यगृहाचे लोकार्पण
  • खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने नाट्यगृहाची उभारणी

डोंबिवली : एखाद्या शहरात ज्यावेळी नाट्यगृह उभे राहते त्यावेळी त्या शहराची एक सांस्कृतिक ओळख निर्माण होते. याच पद्धतीने आज अंबरनाथ शहरात धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर खुले झाल्याने शहराची एक सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण होणार आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबरनाथच्या नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले. तसेच या सर्व नाट्यमंदिराचे पवित्र राखण्याचे काम रसिकांनी करावे असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले. तसेच यावेळी नव्याने सुरू करण्यात आलेल्या नाट्यगृहातील रंगमंचाला ज्येष्ठ रंगकर्मी स्व. बाळ कोल्हटकर यांचे नाव देण्यात आले. तर नाट्यगृहाच्या प्रांगणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केली. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथ शहरातील मैदान येथे भव्य नाट्यगृह उभारण्यात आले आहे. या नाट्यगृहाला धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिर असे नाव देण्यात आले असून आज याचा भव्य असा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे बोलत होते. पद्मश्री, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते. नाट्यगृहाच्या लोकार्पण नंतर भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकाचा प्रयोग पार पडला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शहरात आधीच रस्त्यांचे काँक्रीटीकरण, ग्रंथालये, अभ्यासिका, उद्याने आणि पायाभूत सुविधा उभारल्यानंतर आता या नाट्यगृहाच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रातही नवा अध्याय सुरू झाला आहे. या नाट्यगृहामुळे अंबरनाथ आणि परिसरातील रसिकांना कल्याण किंवा डोंबिवली गाठण्याची गरज आता उरणार नाही. अंबरनाथ शहरातच विविध नाटकांची अनुभूती नागरिकांना घेता येणार आहे. अंबरनाथचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीला नाट्य, संगीत, कला यांचा अनुभव देण्यासाठी हे नाट्यगृह निश्चितच एक महत्वाची वास्तू ठरणार आहे, असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील मान्यवर मंडळीसह आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, डॉ.बालाजी किणीकर, राजेश मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, मनीषा वाळेकर, बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, माजी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, यांच्यासह नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्याला मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील मान्यवर ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे, अशोक समेळ, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेते विजय गोखले, अभिनेत्री अलका कुबल, अभिनेते व दिग्दर्शक विजय पाटकर, अभिनेते मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार आणि संतोष जुवेकर यांसारखे लोकप्रिय कलाकारही या सोहळ्याची शोभा वाढविली आणि सर्वांनी या नाट्यगृहाच्या उभरणीबद्दल खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेबांचे आभार मानले. यावेळी बाळ कोल्हटकर यांच्या कन्या भाषा फाटक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

  • अंबरनाथसाठी ऐतिहासिक क्षण
    अंबरनाथ शहरात धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर खुले झाले आहे. शहराला एक हक्काचं नाट्यगृह मिळालं आहे. अंबरनाथ शहरासाठी हा सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. अंबरनाथ शहर हे सुरुवातीच्या काळात औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जात होती. मात्र ही नगरी अनेक कलावंतांची देखील आहे. आणि आता भविष्यात या शहरची एक सांस्कृतिक नगरीकडे वाटचाल सुरू झाली आहे. असे प्रतिपादन यावेळी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच यासाठी भरीव निधीची तरतूद केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे देखील यावेळी आभार मानले.तसेच यावेळी नव्याने सुरू करण्यात आलेल्या नाट्यगृहातील रंगमंचाला ज्येष्ठ रंगकर्मी स्व. बाळ कोल्हटकर यांचे नाव देण्यात आले. तर नाट्यगृहाच्या प्रांगणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केली.
  • हे नाट्यमंदिर एक प्रकारे शिवमंदीर – अशोक सराफ
    पद्मश्री, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की आज खुले झालेले नाट्यगृह हे एक प्रकारे शिवमंदिर आहे. आणि याचे पावित्र आपण नक्कीच राखुया, असे प्रतिपादन यावेळी अशोक सराफ यांनी केले. तसेच या नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळा मला पाहता आला हे माझे भाग्य असल्याचे यावेळी अशोक सराफ यांनी केले. तसेच या नाट्यगृहात नक्कीच नाटकाचा प्रयोग करणार असे ही सांगितले.
  • अंबरनाथ पश्चिमेतील सर्कस मैदान परिसरात उभारण्यात आलेले हे आधुनिक नाट्यगृह केवळ एक इमारत नाही, तर शहराच्या संस्कृतीचे प्रतीक ठरणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या कल्पक दृष्टीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे नाट्यगृह आकाराला आले. अत्याधुनिक ध्वनियंत्रणा, आकर्षक आणि प्रशस्त रंगमंच, सुमारे ६५८ प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था असलेले हे नाट्यगृह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ परिसरातील एक अभिमानास्पद सांस्कृतिक वास्तू ठरणार आहे. तसेच यात दोन छोटे सभागृह, प्रदर्शन कक्ष, कार्यशाळा सभागृह, ग्रीन रूम, क्राय रूम, उपहारगृह आणि भव्य पार्किंगची सुविधा असल्याने हे नाट्यगृह सर्वार्थाने बहुउद्देशीय ठरणार आहे.