कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेले ” धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिरचे ” लोकार्पण ।

  • कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेले ” धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिरचे ” लोकार्पण ।
प्रमोद कुमार 
डोंबिवली : दिवाळीच्या प्रकाशमय उत्सवात यंदा अंबरनाथ शहरात एक अनमोल सांस्कृतिक दीप प्रज्वलित होणार आहे. अंबरनाथ पश्चिम येथे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेले ” धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिरचे ”  लोकार्पण रविवार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मराठी कलाविश्वातील नामवंत दिग्दर्शक, अभिनेते आणि संगीतकार अंबरनाथ नगरीत उपस्थित राहणार आहेत. अंबरनाथ पश्चिमेतील सर्कस मैदान येथे उभारण्यात आलेल्या या नाट्यगृहाच्या लोकार्पणानिमित्त १९ ते  २६ ऑक्टोबर असे आठ दिवस सुप्रसिद्ध नाटकांच्या विशेष प्रयोगांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तर नाट्यगृहाच्या लोकार्पणाच्या दिवशी ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांच्या सही रे सही या लोकप्रिय नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या शहराच्या या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात सर्व कलारसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे ।