रासरंग – २०२५” चा चौथा दिवस उत्साहात आणि आनंदात साजरा झाला ।

  • “रासरंग – २०२५” चा चौथा दिवस उत्साहात आणि आनंदात साजरा झाला ।

डोंबिवली : डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन प्रस्तुत आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ आयोजित डोंबिवलीतील नवरात्र महोत्सव “रासरंग – २०२५” चा चौथा दिवस आज उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. संध्याकाळी मैदानात जमलेल्या रसिकांनी नैतिक नागदा यांच्या सुरांवर दांडियाचा मनसोक्त आनंद लुटला. तालावर पाऊले जुळवत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्सवात सहभागी होत वातावरण रंगतदार केले.आजचा दिवस विशेष ठरला तो कुटुंबीयांच्या सहभागामुळे. आई-वडील, मुले, मित्रमंडळी आणि नातेवाईक यांनी एकत्र येऊन गरब्याचा आनंद घेतला. कुणी गोलाकार वर्तुळात थिरकत होते, तर कुणी दांडियाच्या ठेक्यावर उत्साहाने गरबा खेळत होते. सर्वांच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव हा दिवस खास बनवत होते. प्रत्येक दिवसागणिक रासरंगची रंगत वाढत असून डोंबिवलीकर नागरिकांचा उत्साह या महोत्सवाला अधिक भव्यता देत आहे ।