-
खडकपाडा पोलिसांची मोठी कारवाई – चोरट्याकडून १४ मोबाईल व दुचाकी जप्त ।
प्रमोद कुमार
डोंबिवली : कल्याण खडकपाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका १९ वर्षीय युवकाला अटक करत त्याच्याकडून तब्बल १४ चोरीचे मोबाईल आणि एक दुचाकी जप्त केली आहे. आरोपीने कल्याण परिसरात विविध ठिकाणी वाहन व मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा ,भिवंडी आणि डायघर पोलिसांत दाखल तक्रारींच्या तपासादरम्यान या गुन्ह्यांचा उलगडा झाला. खडकपाडा पोलिस ठाण्याच्या पथकाने कल्याण परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले । पोलिसांच्या चौकशीत त्याच्याकडून २,३४,००० रु. किंमतीचे १४ मोबाईल फोन्स व अंदाजे ९०,००० रु.दुचाकी जप्त करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये सॅमसंग,वन प्लस ,ओप्पो, विवो,रियलमी, रेडमी, नॉर्ड व अँपल या महागड्या कंपन्यांचे स्मार्टफोन्स आहेत. हे सर्व मोबाईल चोरीचे असून वेगवेगळ्या गुन्हांतून आरोपीने चोरून ठेवले होते. सदर ही उल्लेखनीय कार्यवाही परिमंडळ ३ कल्याण पोलिस उप आयुक्त अतुल झेंडे,सह सय्यक पोलिस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे,खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ.अमरनाथ वाघमोडे,पोलिस निरीक्षक गुन्हे मारुती आंधळे,गुन्हे प्रकटीकरण खडकपाडा पोलिस ठाणे स.पो.नी.विजय गायकवाड व टीम ,अंमलदार, पो. ह. भोईर,बुधकर,लोखंडे,काळे, बगाड,शिंदे यांच्या पथकाने केली. पोलिस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी चोरीचे प्रकरण उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ।