-
कल्याण पश्चिमेतील मोहने कोळीवाडा येथे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून विविध विकासकामांचे भूमीपूजन संपन्न ।
प्रमोद कुमार
डोंबिवली : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १४ मोहने कोळीवाडा येथे आमदार विश्वनाथ भोईर आणि शहरप्रमुख रवी पाटील साहेब यांच्या प्रमूख उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून शाखाप्रमुख रोहन कोट यांच्या पाठपुरावाने ही सर्व विकासकामे केली जाणार असून ज्यामध्ये या भागातील कान्हू काटेकर यांच्या निवासस्थानापासून ते बागडे बिल्डिंगपर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण, शंकर लडकू कोट यांच्या निवासस्थानापासून सिमेंट काँक्रीटीकरण, रामवाडी मयुर तळेकर यांच्या घरापासून हांडे निवासापर्यंत गटार आणि पायवाटा, राजमाता वडापाव ते राजेंद्र शॉपिंग सेंटरपर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण कामासह हसना हॉटेल मागील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती अशा अनेक विकासकामांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या संख्येने ही विकासकामे सुरू झाली असल्याने स्थानिक नागरिकांनी आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांचे आभार मानले आहेत. याप्रसंगी विभाग प्रमुख नाना काटकर, विधानसभा सहसंघटक विजय परियार शाखा प्रमुख रोहन कोट, प्रभात मिश्रा, राजेश पाटील, कृष्णा सेल्वराज, युवसेना शहर प्रमुख दिनेश निकम, कल्याण पश्चिम सोशल मीडिया प्रमुख चेतन कांबरे, युवसेना विभाग प्रमुख चेतन बळुरंगी, भरत भाटी, श्रीपळ मुथा, कृष्णन कोगन, पप्पू कांबळे, राजेश सभाळे, राकेश पाटील, आशिष धिवार, आकाश कांबळे, अजय कोट, सुनिता राठोड, मंगल अल्फांसो, शिवकन्या ठोंबरे, अनु कांबळे, सरस्वती लोखंडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ।