-
कल्याणात काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विशेष बैठक संपन्न ।
डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील पौर्णिमा चौकातील पाम रिसॉर्ट येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि महाराष्ट्र प्रदेश कोकण विभागाचे प्रभारी यु. बी. वेंकटेश साहेब यांनी कल्याण-डोंबिवलीतील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विशेष बैठक ता .९ बुधवारी घेतली. या बैठकीदरम्यान आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाच्या भविष्यातील धोरणांबाबत चर्चा झाली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह व नवचैतन्याची भावना जाणवली. या बैठकीचे आयोजन कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सचिन दत्तात्रय पोटे यांनी केले.या बैठकीमध्ये राजन भोसले साहेब – कल्याण-डोंबिवली प्रभारी, ब्रिज दत्त साहेब – महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांनी देखिल पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्याचे सांगून काही महत्वाच्या सूचना देखील केल्या. या प्रसंगी श्रीकृष्ण सांगळे साहेब – सहप्रभारी, कल्याण-डोंबिवली महाराष्ट्र प्रदेशचे . प्रदीप चौबे, श्गरूगोविंदसिंग बच्चर,कल्याण डोंबिवलीचे कांचन कुलकर्णी,राजाभाऊ पातकर,मुन्ना तिवारी,सुरेंद्र आढाव,विमल ठक्कर, शकील खान,ब्लॉक अध्यक्ष तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी निर्धार व्यक्त केला. अशी माहिती सचिन पोटे जिल्हाध्यक्ष,कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी दिली आहे ।