केडीएमसी कडून ५ सेमी-इंग्लिश शाळांची मुहूर्तमेढ – आयुक्त अभिनव गोयल यांची घोषणा ।

  • केडीएमसी कडून ५ सेमी-इंग्लिश शाळांची मुहूर्तमेढ – आयुक्त अभिनव गोयल यांची घोषणा ।
  • यंदाच्या वर्षीपासून होणार सेमीइंग्लिश शाळांचा 
  • शुभमुहूर्त ।

कल्याण : शिक्षणात पालिकेतील मुलाचा दर्जा वाढण्यासाठी आणि स्पर्धेत टिकण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे कायापालट अभियानांतर्गत केडीएमसी प्रशासनाने आपला शैक्षणिक विभाग सुधारणा आणि नवनवीन संकल्पनांनी अक्षरशः ढवळून काढला आहे. त्याचाच एक भाग किंवा या कायापालट अभियानाचे पुढचे पाऊल आणि काळाची गरज ओळखून केडीएमसी प्रशासनाने आता सेमी- इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या सेमी इंग्रजी शाळांचा श्रीगणेशा होणार असल्याची घोषणा केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केली. केडीएमसीतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रत्येक अधिकाऱ्यावर एका शाळेची जबाबदारी…

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महापालिकेच्या प्रत्येक शाळेसाठी एका अधिकाऱ्यास पालक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांकडून शाळा सुरू होण्याच्या दिवशीच प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली जाईल. ⁠शाळांमधील आनंददायी वातावरणासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये बाळा” पद्धतीचे भित्तीचित्रांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शाळांची दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच फर्निचर देखील पुरविण्यात येणार आहे. ⁠पाठ्यपुस्तके व वह्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यात येतील. त्याचप्रमाणे दप्तर, मोजे, बुट हे देखील देण्यात येणार आहेत. गुणवत्ता पुर्ण शिक्षणासाठी *”निपूण”* अंतर्गत प्रार्थमिक शिक्षणावर भर दिला जाणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेचे डिजिटल मॉनिटरिंग *”विनोबा भावे अ‍ॅप”* द्वारे करण्यात येणार आहे.संबंधित पालक अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या शाळेला नियमितपणे भेट देऊन प्रगतीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांसोबत आढावा बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिका मुख्यालयात २४× ७आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, तिथे रात्रपाळीची जबाबदारी उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.सर्व प्रभाग कार्यालयांमध्येही आपत्कालीन कक्ष कार्यरत करण्यात आलेले आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये स्वतंत्र आपत्कालीन पथक नियुक्त केले गेले असून, यामध्ये प्रभाग अधिकाऱ्यांसह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना देखील जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आपत्कालीन परिस्थितीत लवकर प्रतिसाद देणे, सुलभ होणार आहे ।