कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्र.३० मधील विकासकामांचे भूमीपूजन संपन्न ।

  • कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्र.३० मधील विकासकामांचे भूमीपूजन संपन्न ।

डोंबिवली : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३० चिखले बाग – मल्हार नगर येथील विविध विकासकामांचा भूमीपूजन सोहळा आज थाटात संपन्न झाला. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या आमदार निधीतून, स्थानिक लोकप्रतिनिधी श्रेयस समेळ यांच्या प्रयत्नातून शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे साहेब आणि युवासेना जिल्हा चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक ३० चिखले बाग मल्हार नगर येथे गणेश नगर चाळ क्रमांक ६ आणि ७ मधील भुयारी गटार तयार करणे आणि मल्हार नगर येथे पायवाटा तसेच गटार तयार करणे ही विकासकामे केली जाणार आहेत.या विकासकामांबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांचे मनापासून आभार मानले आहेत. याप्रसंगी शाखाप्रमुख संतोष घोलप, अचिव्हार्स कॉलेजचे महेश भिवंडीकर सर, उपविभाग प्रमुख बंटी कुलकर्णी, उपशाखा प्रमुख हितेश भंडारी, प्रदीप वेदपाठक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ।