- कल्याण डोंबिवली मध्ये ‘ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन – अवैध धंद्यावर पोलिसांची धडक कारवाई; एकूण २५ गुन्हे दाखल ।

डोंबिवली : ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत कल्याण व डोंबिवली शहरात ९ मे २०२५ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १० मे २०२५ रोजी पहाटे १ वाजेपर्यंत ‘ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले.
मोहिमेत एकूण ४७ पोलीस अधिकारी व २०८ पोलीस अमलदार सहभागी झाले होते. या कारवाईदरम्यान विविध प्रकारच्या गुन्ह्यावर कठोर कारवाई करण्यात आली. यामध्ये शस्त्र जप्ती (भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५) – ३, अवैध धंद्यावर कारवाई – ९, दारू विक्री – ६, दारूबंदी – ३, तंबाखूजन्य पदार्थावरील कारवाई – २६,प्रतिबंधात्मक कारवाई – ८८, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत – २, अमली पदार्थ संबंधित कारवाई – ७ व अमली पदार्थ सेवन – ७ अशा एकूण २५ गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यासोबतच फरारी आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड हिस्ट्रीसीटर व हद्दपार आरोपीचीही तपासणीही करण्यात आली. कल्याण डोंबिवली शहरात एकूण १० ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान एकूण २७६ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६६ वाहनांवर मोटर वाहन कायदान्वये कारवाई करून एकूण ७८,७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा प्रकारची’ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन’कारवाई कल्याण व डोंबिवली शहरात सातत्याने सुरूच राहणार आहे ।