-
रुक्मिणीबाई रुग्णालयावर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांची – नागरिक बनून यंत्रणेची झाडझडती ।

डोंबिवली :- सतत तक्रारीच्या भोवऱ्यात असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयावर ७ मे २०२५ रोजी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सामान्य नागरिक बनून अचानक भेट दिली. रुग्णालयातील सेवा आणि कार्यपद्धतीची तपासणी करण्यासाठी त्यांनी रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांच्या भूमिकेतून सकाळी ९ ते ११ वा. दरम्यान विविध विभागामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेतला. या दोऱ्यात आयुक्तांनी केस पेपर काढणे, ओपीडी सेवा, फार्मसी व्यवस्था आदी मुख्य भागाची पाहणी करत डॉक्टर व कर्मचाऱ्यांची थेट झाडझडती घेतली.
गेल्या काही महिन्यापासून वाढत्या तक्रारी आणि नुकत्याच घडलेल्या एका महिलेच्या मृत्यूमुळे रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आयुक्तांची अचानक भेट महत्त्वाची ठरला आहे. या भेटीनंतर आयुक्त गोयल यांनी सांगितले की, रुग्णांना जलद उपचार, मोफत औषधे, आणि गरजेनुसार वेळेत ॲम्बुलन्स सेवा मिळणे अत्यावश्यक आहे. डॉक्टरांनी रुग्णांना अनावश्यकपणे इतर रुग्णालयात पाठवू नये, तर गंभीर रुग्णासाठी जलद आणि व्यवस्थित रेफरल प्रणाली तयार करण्याची जबाबदारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांच्यावर देण्यात आली आहे. दररोजच्या कामकाजाची पाहणी करून यंत्रांना सुरळीत चालते आहे की नाही, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. महापालिका आयुक्त गोयल यांनी स्पष्टपणे सांगितले की आरोग्यसेवेतील हलगर्जेपणा खपवून घेतला जाणार नाही असेही स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या ।

Post Views: 419