केडीएमसी मधील कर्मचारी दीड हजार घेताना एसीबी कडून अटक ।
डोंबिवली :- कल्याण डोंबिवली महापालिकेतील आय प्रभाग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी संतोष पाटणे (५१) यांना आज ठाणे लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून दीड हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आतापर्यंत ४५ आकडा लाच घेतानांचा ओलांडला आहे . कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आय प्रभागात एका नागरिकांनी मॅरेज सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अर्ज केला होता. सदर दाखला तात्काळ मिळावा यासाठी त्यांनी महापालिकेच्या आय प्रभागातील नागरिक सुविधा केंद्रामध्ये अर्ज केला होता. तो अर्ज तात्काळ हवा असल्यास पाटणे यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. याबाबत सदर नागरिकांनी ठाणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज दुपारी महापालिका कर्मचारी संतोष पाटणे यांनी सदर नागरिकाकडून तत्काळ मॅरेज सर्टिफिकेट देण्यासाठी २ हजार रुपये ची मागणी केली होती मात्र तडजोड केल्यानंतर दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ।