जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव सोहळा संपन्न ।

  • जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव सोहळा संपन्न ।

  • ठाणे ग्रामीण भागातील ३० जागांपैकी जिल्हा परिषद शाळेतील २३ विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परिक्षेत मिळवले घवघवीत यश ।

प्रमोद कुमार

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधून जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती धारक यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या कष्टाचे, जिद्दीचे आणि गुणवत्तेचे कौतुक करण्यासाठी आज, दि. ०९ एप्रिल, २०२५ रोजी बी. जे. हायस्कूल सभागृहात विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. दिशा प्रकल्पाच्या अंमलबजावणीतून विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याच्या स्पर्धा परिक्षामार्फत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी काम केले जात आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३० जागांपैकी २३ विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षा पात्र आहेत ही मोलाची बाब आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या यशाचा सन्मान करण्यात आला असून शहापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी ज्यापद्धतीने यश संपादित केले त्याच पद्धतीने इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदवावा. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती मिळवलेल्या सर्व विद्यार्थी तसेच शाळेचे अभिनंदन आणि पुढील वर्ष जास्त विद्यार्थ्यांना संधी मिळेल यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या सततच्या प्रेरणेमुळे, मार्गदर्शनामुळे आणि प्रभावी शैक्षणिक धोरणांमुळेच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना अशा संधी उपलब्ध करून देणे ही आनंदाचीबाब आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले.शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहीतुले यांनी ग्रामीण भागातील शाळांमधून स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश मिळवणे म्हणजे केवळ विद्यार्थ्यांचे नव्हे तर त्यांच्या शिक्षकांचे, पालकांचे आणि संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेचेही यश आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत पहिल्यांदा या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.यावेळी भाऊसाहेब चव्हाण, गटशिक्षणाधिकारी (शहापूर), देवदत्त शिंदे प्रभारी उपशिक्षणाधिकारी, आशिष झुंजारराव विस्तार अधिकारी (शिक्षण), जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व पालक तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३० जागांपैकी २३ विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षा पात्र असून त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण ५७ शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुस्तक देऊन गुणगौरव करण्यात आला. सर्व उपस्थिताचे आभार आशिष झुंजारराव विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी व्यक्त केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक विनोद कोर यांनी करून कार्यक्रमाची धुरा सांभाळली