छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अभिवादन सोहळा संपन्न ।

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अभिवादन सोहळा संपन्न ।

डोंबिवली  : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा डोंबिवली पूर्व येथे उभारण्यात आला आहे. आज या पुतळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण ग्रामीण व डोंबिवलीतील सर्व शिवसैनिक, युवासैनिक, पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून जल्लोषात अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.या भव्य, दिव्य व आकर्षक शिल्परूप पुतळ्याचे साकारकर्ते शिल्पकार अश्विन पालवनकर आणि अतिश पालवनकर या बंधूंचा विशेष सत्कार शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.या वेळी त्यांच्या उत्कृष्ट कार्याचे सर्व उपस्थितांच्या वतीने कौतुक व गौरव करण्यात आले.या प्रसंगी कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, रमेश पाटील, डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, अभिजीत सावंत यांच्यासह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसैनिकांचा एकजूट आणि शिवभक्तीची अनोखी ऊर्जा पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि देशभक्तीचा गर्जा पुन्हा एकदा डोंबिवलीत अनुभवायला मिळाला.