- कोनगाव ग्रामपंचायत परिसरात झाड पडले; ग्रामपंचायत अधिकारी मनीष महाजन गैरहजर ।
कल्याण : भिवंडी तालुक्यातील कोनगाव ग्रामपंचायत हद्दीत एक झाड रस्त्यावर कोसळल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरीही वाहतुकीवर परिणाम झाले होते । घटनेची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात देण्यात आली असतानाही ग्रामपंचायत अधिकारी गैरहजर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “दरवर्षी पावसाळ्यात अशीच स्थिती उद्भवते, पण प्रशासन मात्र झोपेत आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली कोनगाव ग्रामपंचायतीचे निष्काळजी व विवादीत ग्रामसेवक मनीष महानंद महाजन यांच्यावर कारवाई करण्याची नोटीस भिवंडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी बजावली आहे. दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्हा परिषदेने भिवंडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत कार्यालयांच्या ग्रामसेवक अधिकाऱ्यांना आदेश दिले होते की, पावसामुळे त्यांना त्यांच्या कार्यालयात राहून नैसर्गिक आपत्तीनुसार नागरिकांना सुविधा देण्याचे आणि पूर आल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, बुधवार, २० ऑगस्ट रोजी कोनगाव ग्रामपंचायत हद्दीत अनंत हलवाई यांच्या दुकानाजवळ एक झाड पडले. सुदैवाने मोठी घटना टळली. परंतु अशा परिस्थितीत ग्रामसेवक मनीष महाजन त्यांच्या कार्यालयातून गैरहजर होते. झाड पडल्याची माहिती मिळताच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी इंद्रजित गणपत काळे यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि सुमारे दोन तासांत सदर झाड काढून टाकण्यात आले. त्यानंतर विस्तार अधिकारी इंद्रजित काळे यांनी कोनगाव ग्रामपंचायतीत चौकशी केली असता, १८ ते २० ऑगस्ट या कालावधीत ग्रामसेवक मनीष महाजन कार्यालयात गैरहजर असल्याचे आढळून आले. कोनगाव ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असलेल्या १३ कर्मचाऱ्यांच्या साक्षीने हे सिद्ध झाले आहे. अशाप्रकारे, भिवंडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी निष्काळजी ग्रामसेवक अधिकारी मनीष महानंद महाजन यांच्यावर कोणत्याही परवानगीशिवाय कार्यालयात गैरहजर राहिल्याबद्दल आणि ठाणे जिल्हा परिषदेने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. यापूर्वी, ग्रामपंचायत अधिकारी मनीष महानंद महाजन यांना २०१७ मध्ये 75000 हजारची लाच घेताना रंगेहात एसीबीने अटक केली होती. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध नोटीस बजावण्यात आली आहे. आता हे पाहायचे आहे की मनीष महाजन यांना तात्काळ निलंबित केले जाईल की ते निष्काळजीपणा करत राहतील आणि याच पदावर राहून मनमानी कारभारा व विष्काळजीपणा करत राहतील की निलंबित होणार अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे