राज्याच्या नगरविकास विभागाकडून २ कोटींचा निधी मंजूर

  • दिवा शहरातील आगासन येथे उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा !
  • राज्याच्या नगरविकास विभागाकडून २ कोटींचा निधी मंजूर
  • खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुरव्याला यश ।
प्रमोद कुमार 
डोंबिवली :  कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासकामांना आणखी गती मिळत असून, दिवा शहरातील आगासन रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्याच्या नगर विकास विभागाकडून तब्बल २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे लवकरच आगसन येथे या पुतळ्याच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरु होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि  संकल्पनेतून गेल्या काही वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, क्रीडा सुविधा, सांस्कृतिक वारसा संवर्धन अशा विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. दिवा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या भागांमध्ये पायाभूत सुविधा उभारणीपासून ते स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यापर्यंत अनेक प्रकल्प राबविण्यात आले आहेत. तर आपल्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या मतदारसंघातील प्राचीन मंदिर परिसरांचा विकास करण्यासमवेतच महापुरुषांचा सन्मान राखत त्यांची स्मारके देखील मतदारसंघात उभारण्यात येत आहे. याच पद्धतीने खासदार डॉ.शिंदे यांच्या पुढाकाराने डोंबिवली येथील घारडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. मानपाडा येथे ही मेघडंबरीत विराजमान असलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याच पद्धतीने दिव्यातील आगासन रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्याच्या नगर विकास विभागाकडून तब्बल २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे लवकरच आगसन येथे या पुतळ्याच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरु होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा सांस्कृतिक अभिमानाच्या  प्रतिका समवेतच स्थानिक नागरिकांमध्ये प्रेरणादायी संदेश देणारा ठरेल. तर आगासन रोड परिसरातील या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे दिवा शहराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वी मतदारसंघातील अनेक विकास प्रकल्पांसाठी निधी मिळवून दिला असून, नागरिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न सुरू आहे. दिवा शहरातील हा प्रकल्प हे त्याच विकास प्रवाहातील आणखी एक पाऊल आहे ।