खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण; सीसीटीव्हीत कैद ।
प्रमोद कुमार
डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील नांदिवली परिसरात असलेल्या एका खाजगी बालचिकित्सालय रुग्णालयात काम करणाऱ्या मराठी रिसेप्शनिस्ट तरुणाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ “डाॅक्टरांकडे एमआर बसले आहेत, तुम्ही जरा थांबा” इतके बोलल्याने संतप्त झालेल्या गोकुळ झा या परप्रांतीय तरुणाने रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.इतकी हिंमत कोणाच्या जोरावर येत आहे अशी चर्चा परिसरात पसरली आहे . हा संताप जनक प्रकार संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गोकुळ झा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र हिंदी भाषांचा प्रकार ताजे असताना आता परप्रांतीय व्यक्तीकडून तरुणीला मारहाणीचा कृत्य समोर आले ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली. पीडित तरुणी दोन शिफ्टमध्ये काम करत असून ती त्या दिवशी संध्याकाळच्या शिफ्टमध्ये होती. एक महिला आपल्या बाळासोबत उपचारासाठी रुग्णालयात आली होती. त्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे काही रुग्ण वाट पाहत होते. डॉक्टरांच्या केबिनमध्ये एमआर असल्याचे रिसेप्शनिस्ट तरुणीने सांगितले असता, त्या महिलेबरोबर आलेल्या गोकुळ झा नामक तरुणाने रागाच्या भरात तरुणीवर हल्ला चढवला. त्याने तिचा हात पकडून बाहेर ओढत शिवीगाळ आणि मारहाण केली. या घटनेनंतर पीडित तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे कल्याण पूर्व भागात मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनसे पदाधिकारी अरुण जांभळे, कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची भेट घेऊन तिला मानसिक आधार दिला. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. मनसेने स्पष्ट केले आहे की, पोलीस आरोपीला शोधत असले तरी आम्हीही आमच्या पातळीवर आरोपीचा शोध घेऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ. दरम्यान डोंबिवली विभागाचे मनसे नेते सुहास हेमाडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा असून पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला अटक करावी. आम्ही पीडित तरुणीच्या पाठीशी आहोत.”या घटनेमुळे मराठी तरुणींवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परप्रांतीयांकडून स्थानिकांवर होणारे हे प्रकार थांबले पाहिजेत, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे ।