कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिर पर्यंत सिमेंट रस्त्याच्या काँक्रीटच्या कामाचे भूमिपूजन संपन्न ।

  • कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिर पर्यंत सिमेंट रस्त्याच्या काँक्रीटच्या कामाचे भूमिपूजन संपन्न ।

प्रमोद कुमार 

कल्याण : प्रभाग क्र. ५ गौरीपाडा या प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या मागणी नुसार भाजपा विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे यांच्या प्रयत्नांतुन आमदार विश्वनाथ भोईर  यांच्या आमदार निधीतून कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिर पर्यंत हा रस्ता बनवण्यात येणार आहे. या कामाकरिता आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी १ कोटी निधी उपलब्ध करून दिला असून त्याद्वारे ह्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांचे मनापासुन आभार मानले आहेत । कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गौरीपाडा येथे कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिर सिमेंट रस्त्याच्या काँक्रीटीकरण करणे या कामाचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि युवासेना जिल्हा चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले । या प्रसंगी मा.नगरसेवक दया गायकवाड, श्याम मिरकुटे, युवासैनिक प्रशांत म्हात्रे, सुभाष मिरकुटे, विजय म्हात्रे, साईनाथ म्हात्रे, भावना मनराजा, संगीता पाटील, पौर्णिमा मोरे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ।