जुनी डोंबिवली मोठागाव परिसरातील शेतकरी बिल्डरच्या विरोधात एकवटले ।

  • जुनी डोंबिवली मोठागाव परिसरातील शेतकरी बिल्डरच्या विरोधात एकवटले ।         
  • डोंबिवली पश्चिम मधील जुनी डोंबिवली मोठागाव येथील शेतकऱ्यांत विकासकांच्या विरोधात नाराजी ।

डोंबिवली : जुनी डोंबिवली मोठा गाव परिसरातील शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी 19 वर्षांपूर्वी कवडीमोल भावाने विकासकाने विकत घेतल्या,त्यातील किमान 65/70 एकर जमीन वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून स्वस्तात घेऊनही अद्याप पर्यंत निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना पूर्ण आर्थिक मोबदला दिला गेला नाही.काही मोजक्या शेतकऱ्यांशी कायदेशीर कागदोपत्री व्यवहार केला गेला. परंतू काही शेतकऱ्यांशी आर्थिक आणि कायदेशीर व्यवहार अपूर्ण ठेवून त्यांची फसवणूक झाली असा ग्रामस्थांचा आरोप असून.19 वर्ष लोटली तरी व्यवहार अजूनही अर्धवट अवस्थेत आहे.शिवाय ह्या अर्धवट व्यवहारामुळे,आजच्या बाजार भावानुसार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून,सदर विकसका विरोधात संपूर्ण गाव एकत्र आला आहे.गावातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा आणि विकसकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थानी जुनी डोंबिवलीतील गणेश घाट येथे गावकऱ्यांच्या एकजुटीसाठी बैठक बोलावली होती. सदर बैठकीत सर्वानुमते विकासकाच्या मनमानी कारभार विरोधात सुरुवातीला कायदेशीर मार्गाने न्याय मागण्यात येईल,त्यातून ज्यांच्या शेतजमिनी विकासकाने भूविकासाच्या नावाखाली अडकवून ठेवल्या आहेत. तसेच गेली 19 वर्षे शेतकऱ्यांना अडवून ठेवले असल्याने, शेवटी शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले.सदर प्रकरणात अनेक तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी असल्याने आधी कायदेशीर मार्गाने न्याय मागण्यात येईल.योग्य न्याय मिळाला नाही तर मग विकासका विरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला ।