-
भाजपाचे दोन दिग्गज नगरसेवक ठाकरेच्या गळाला लागण्याची शक्यता , प्रभाग निधी मिळत नसल्याने नाराजी ।
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील गरीबांचा वाडा प्रभागात कोणतेही विकास निधी मिळत नसल्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी विकास म्हात्रे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा पत्रकारांसमोर झाली आहे । उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपच्या दोन नगरसेकांचा प्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत लागण्याच्या अगोदर भाजपला मोठा धक्का बसला आहे । भाजपाच्या दोन नगरसेवकांनी जिल्हा अध्यक्षाकडे राजी नामा दिला आहे .सन्मानाची वागणूक मिळाली नाही त्यामुळे भाजपाला राम राम ठोकला आहे .बाजूचे दोन वॉर्ड शिवसेना मनसे या वॉर्ड मध्ये निधी दिला आहे बीजेपी चे आम्ही नगरसेवक आहोत आम्हाला निधींपासून डावलले आहे । कोणताही मान मिळाला नाही ,पद वाटपात विचारात घेतले नाही .विधान सभेच्या निवडणुकीत रविंद्र चव्हाण यांना लिड दिले आहे तरीही नाराज आहेत याचे कारण मला समजले नाही ।
उध्दव ठाकरे रविवारी डोंबिवलीत येणार आहेत
विकास म्हात्रे ठाकरे गटात प्रवेश करणार! ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू आहे ।मात्र ठाकरे गटात सन्मान मिळाला तर ठाकरे गटात जाणार असल्याची भूमिका विकास म्हात्रे घेणार आहेत दरम्यान जनसंपर्क कार्यालयाचे भाजपाचे बॅनर हटवले असून विकास म्हात्रे,कविता म्हात्रे हे लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत ।