- अमृत पार्क कॉम्प्लेक्स येथील उंबराचे मोठे झाड आज सकाळी उन्मळून पडले ,कोणतीही जीवितहानी झाली नाही ।
कल्याण : वायले नगर मधील अमृत पार्क कॉम्प्लेक्स येथील उंबराचे मोठे झाड आज सकाळी उन्मळून पडले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र झाडाच्या मोठ्या फांद्या शेजारील नेबुला दर्शन इमारतीच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या फ्लॅट धारकांच्या किचन आणि बेडरूमच्या संरक्षक ग्रील आणि पत्र्यावर पडल्यानं घर मालकांचे किरकोळ नुकसान झाले आहे । स्थानिक रहिवासी करूणा शिर्के यांनी कल्याण अग्निशमन दलास याबाबत कळविल्या नंतर अग्निशमन जवानांनी दोन तास मेहनत घेऊन उन्मळून पडलेले झाड आणि त्याच्या फांद्या छाटून आपले कर्तव्य बजावले. खाजगी सोसायटी मधील रहिवाशांनी मोठी झाडे लावल्यानंतर त्याची योग्य निगा राखणे झाडांच्या अनावश्यक वाढलेल्या मोठ्या फांद्या मनपाची परवानगी घेउन त्याची छाटणी करणे बाबतचे आवाहन यावेळी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे ।