- आमदार विश्वनाथ भोईर यांच्या विशेष सहकार्यातून प्रभाग क्रमांक ३६ मध्ये विकासकामांचे भूमीपूजन ।

प्रमोद कुमार
डोंबिवली : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या विशेष सहकार्यातून आणि प्रतीक प्रकाश पेणकर यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक ३६ येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भोईर साहेब आणि शहर प्रमुख रवी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रभाग क्रमांक ३६ येथील पिलाजी बाग येथे गटार, पायवाट आणि देवदार सोसायटी ते जिजामाता उद्यानापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचे हे विकासकाम आहे. ही महत्त्वाची विकासकामे लवकरच मार्गी लागणार असल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांचे मनापासून आभार मानले. याप्रसंगी प्रणव पेनकर, उपविभाग प्रमुख सचिन सांगळे, नागेश बोडके, शाखा प्रमुख संदीप सांगळे, आदित्य खरमारे, विकास गुप्ता, संजय माथ्यू , रघू नायर, इम्रान शेख यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ।

Post Views: 84