“जन सेवा हीच ईश्वर सेवा”श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यामाने सीबीडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – आ.सौ.मंदा म्हात्रे
प्रमोद कुमार
नवी मुंबई :- श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने “नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव 2025 च्या अंतर्गत सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदान, सेक्टर – 1 येथे बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सौजन्याने मोफत महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोफत महाआरोग्य शिबिराला शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभला. तसेच लॉयन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स, डॉ. प्रताप मुदलियार, मयुरेश हॉस्पिटल तुर्भे व साईदृष्टी आय हॉस्पिटल-सानपाडा बॉडी-चेक हेल्थ सर्व्हिसेस प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाआरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, डायबिटीस, बीएमआय, ईसीजी, डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला तसेच मोफत औषधे, डाबर च्यवनप्राश व मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, गेली 28 वर्षापासून मी निवडून आली तेव्हापासून मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करीत आहे. तसेच मला अत्यंत आनंद होत आहे की जनतेची व वयोवृद्ध नागरिकांची सेवा करण्यास मला संधी मिळत असून हे कार्य मी पुढे सुरूच ठेवणार आहे. तसेच सर्दी, ताप अश्या अनेक प्रकारच्या आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करत आहोत. तसेच सदर शिबिराला शेकडो नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहून मला समाधान वाटत आहे. माझे अनेक सहकारी यांच्या सहकार्याने सदर महाआरोग्य शिबीर संपन्न झाली. सीबीडी येथील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी, त्यांना मोफत औषधे उपलब्ध व्हावी, हा यामागचा उद्देश असून श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या विद्यमाने “महाआरोग्य शिबिराचा” सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून शिबिराचा लाभ घेतला.यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, संजय ओबेरॉय, अजय सिंग, मनी कोणार, प्रभाकर कांबळे, अजय वर्मा, रवी ठाकूर, किरण वर्मा, आरती राउळ, माधुरी सावंत, लॉयन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्सचे डॉ. प्रताप मुदलियार, डॉ. अनिकेत सोनावणे (ओर्थोपेडिक सर्जन), डॉ. निखिल पाटील (कार्डीओलोजीस्ट), डॉ. राजपाल उसनाले, डॉ. रीना अग्रवाल तसेच असंख्य नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.