आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी विविध पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत “यू टाईप रस्ता रुंदीकरण” पाहणी दौरा ।

  • आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी विविध पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत “यू टाईप रस्ता रुंदीकरण” पाहणी दौरा ।

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी मुबंई महानगर प्रादेश विकास प्राधिकरण, आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी विविध पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत “यू टाईप रस्ता रुंदीकरण” पाहणी दौरा गुरुवारी करण्यात आला. या पाहणीदरम्यान आमदार सुलभा गायकवाड यांनी नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने रस्ता रुंदीकरणाची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्हावी. तसेच या रस्ता रुंदीकरणात विस्थापित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन प्रधान्याने व्हावे अशी आग्रही भूमिका मांडली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदे, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, नवीन गवळी, रितेश खराटे, मंडळ अध्यक्ष विजय उपाध्याय, अमिताभ सिंग ठाकूर, शहर अभियंता अनिता परदेशी, सहाय्यक संचालक नगररचना गणेश डोईफोडे, नगररचनाकार सचिन घुटे, प्रभाग क्षेत्र अधिकारी सविता हिले, रमेश चव्हाण, जगदीश कोरे तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ।