- कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘ एकता दौड ‘ चे आयोजन ।
डोंबिवली : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२५  रोजी राष्ट्रीय एकता दिन देशभर साजरा करण्यात आला आहे. या निमित्ताने राष्ट्रीय एकतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी परिमंडळ  ३ कल्याण अंतर्गत  पोलिसांकडून ” एकता दौड ” ( Run for Unity) चे आयोजन करण्यात आले होते. ही दौड कल्याण परिमंडळातील सर्व पोलीस ठाणे मार्फत सकाळी ९ वा. एकाच वेळी सुरू करण्यात आली असून, पोलीस अधिकारी, कर्मचारी , तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या दिनाचे महत्व नागरिकांना पटण्यासाठी पोलिस प्रशासनाने चांगल्या प्रकारे पुढाकार घेतला होता.  देशातील एकतेचा, ऐक्याचा आणि सुसंवादाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात सर्व शहरातील जनतेने सहभाग नोंदवला. महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथून सुरुवात करण्यात आली असून – प्रेम ऑटो सर्कल – बिर्ला महाविद्यालय – व्हेगास हॉटेल – भाई स्वामी – संदीप हॉटेल  – प्रेम ऑटो सर्कल येथे समाप्त करण्यात आली. बाजारपेठ पोलिस ठाण्याची सुरूवात सुभाष मैदानातून करण्यात आली असून – आचार्य अत्रे नाट्यगृह  – अहिल्यादेवी चौक – गांधी चौक  – परत सुभाष मैदान पर्यंत समाप्त.कोळसेवाडी ठाण्याची सुरूवात १०० फूट रोड  जिजा वाईन्स येथून  झाली असून, ६० फूट रोड – गॅस गोडाऊन चौक – आय वॉर्ड समोरून – फिरून जिजा वाईन्स पर्यंत समाप्त करण्यात आहे. खडकपाडा पोलीस ठाणे पोलिसांकडून सुरुवात युनियन मैदान , पोदार शाळेसमोर, वायलेनगर कल्याण पश्चिम येथून  करण्यात आली असून,डी.सी.पी.कार्यालय चौक – अग्रसेन चौक – निक्की नगर – डी.बी.चौक येथून यूटर्न घेऊन पुन्हा त्याच मार्गे युनियन मैदानपर्यंत समाप्त करण्यात आली. डोंबिवली पोलिस ठाणे यांच्याकडून आप्पा दातार चौक ,गणपती मंदिर येथून  सुरवात करण्यात आली असून, नेहरू रोड – नेहरू गार्डन – नाका न.१ – साई पूजा हॉटेल पासून डावीकडे वळून डोंबिवली ट्रॅफिक ऑफिस – इंदिरा चौक – बाजीप्रभु चौक – गणपती मंदिर ,आप्पा दातार चौक पर्यंत समाप्त करण्यात आली.विष्णुनगर पोलिस ठाणे यांच्याकडून महात्मा गांधी उद्यान एम.जी.रोड डोंबिवली पश्चिम येथून सुरवात करण्यात आली असून, दीनदयाल रोड – सम्राट चौक – रेती बंदर चौक विष्णुनगर पोलिस ठाणे येथे समाप्त करण्यात आली.मानपाडा पोलीस ठाणे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरवात करण्यात आली असून, पेंढारकर कॉलेज चौक आर आर हॉस्पिटल चौक – रिजन्सी अनंतम् चौक –  विको नाका – मानपाडा पोलीस ठाणे येथे समाप्त करण्यात आली. टिळकनगर पोलिस ठाणे यांच्याकडून लक्ष्मी पार्क सोसायटी ९० फुटी रोड,डोंबिवली पूर्व  येथून सुरवात करण्यात आली असून, पत्रीपूल – कचोरे कल्याण पूर्व येथे समाप्त करण्यात आली.या एकता दौडीमुळे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते, सहभागी सर्वांनी ” एक भारत,श्रेष्ठ भारत ” चा नारा देत राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला ।

				 Post Views: 43