एक्सपायरी बियर विक्रीचा धक्कादायक प्रकार – कल्याण मध्ये ग्राहकाची प्रकृती बिघडली ।

  • एक्सपायरी बियर विक्रीचा धक्कादायक प्रकार – कल्याण मध्ये ग्राहकाची प्रकृती बिघडली ।

डोंबिवली : कल्याण पश्चिम येथील प्रेम ऑटो जवळील रियल बियर शॉप मधून एक्सपायरी बियर विकत घेतल्याने एका ग्राहकाची प्रकृती बिघडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक्सपायरी झालेली बियर पिल्यानंतर ग्राहकाची तब्येत खालवल्याने त्याने उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या दुकानावर धाड टाकली । कल्याण डोंबिवली मध्ये तीन चार घटना मुद्दत संपल्याची दुकानात आढळून आले आहेत तपासादरम्यान दुकानात मोठ्या प्रमाणावर एक्सपायरी डेट संपलेल्या बियरचा साठा आढळून आला. संबंधित साठा अधिकाऱ्यांनी जप्त केला असून, दुकान मालकावर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे.बियर शॉप चे परवाना रद्द करण्यात येणार की नाही .या बाबत उत्पादन शुल्क अधिकारी कोणता निर्णय घेणार असा प्रश्न ग्राहक जनतेकडून उपस्थित करण्यात येथ आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, उत्पादन शुल्क विभागाने एक्सपायरी दारू विक्री प्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे ।