काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश ।

  • काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश ।
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला प्रवेश
  • खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची ही उपस्थिती
  • माजी नगरसेवक सदाशिव शेलार आणि माजी नगरसेविका दर्शना शेलार यांचा शिवसेनेत प्रवेश ।

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक, डोंबिवली शहर पूर्व विभाग ए ब्लॉकचे अध्यक्ष सदाशिव शेलार आणि माजी नगरसेवक दर्शना शेलार यांनी शिवसेनेत आज जाहीर प्रवेश केला. यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी ही शिवसेनेचा भगवा हाती घेतला. शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे ही उपस्थित होते. यावेळी सर्वांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात शिवसेनेचा विस्तार वेगाने होत असून विविध पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत प्रवेश घेत आहेत. लोकाभिमुख कार्यपद्धती, विकासाभिमुख निर्णय आणि जनतेशी असलेला थेट संवाद या माध्यमातून जनतेचा विश्वास शिवसेनेवर अधिक दृढ होत आहे. तर आगामी महापालिका, पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक महत्वाच्या नेत्यांच्या माध्यमातून विभाग निहाय आढावा बैठकांचे सत्र सुरू आहे. तर विविध पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश देखील होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे डोंबिवली शहर पूर्व विभाग ए ब्लॉकचे अध्यक्ष, माजी नगरसेवक सदाशिव शेलार, काँग्रेसच्या माजी नगरसेविका दर्शना शेलार यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्य उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करत हाती भगवा घेतला. यांच्यासह अजय शेलार, हिरामण मोरे, दशरथ म्हात्रे, प्रतीक शेलार, पुण्यदान सरोदे, राहुल पढाडे, मोहन भोसले, ख्वाजा शेख, सलील चौधरी, प्रसाद कीर, विशाल म्हात्रे आणि मोठ्या संख्येने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, बाळा म्हात्रे, संदेश पाटील, कविता गावंड, सागर जेधे, जयेश सकपाळ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते ।