- ठाणे शहरातून एअरपोर्ट उद्घाटनाच्या मोदींच्या सभेसाठी दीडशे बस रवाना होणार – संदीप लेले
प्रमोद कुमार
ठाणे : बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी उलवे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी हे उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी पनवेल आणि कल्याण भाईंदर नवी मुंबई ठाणे या ठिकाणाहून कार्यकर्ते उत्साहाने सहभाग घेणार आहे या करता ठाणे शहर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भव्य बैठक जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या अध्यक्षतेत पार पडली अत्यंत उत्साहात पार पडलेल्या बैठकीत सुमारे 400 कार्यकर्ते उपस्थित होते । भारतीय जनता पार्टीतर्फे ठाणे शहरातून 33 प्रभागातून जवळपास 150 बसेस या उलवे पनवेल येथे मोदीजींचे जनतेला संबोधन आणण्यासाठी जाणार आहेत। शहरातील कोपरी, वागळे, इंदिरानगर, लोकमान्य नगर, ज्ञानेश्वर वैती वाडी, वर्तक नगर, शिवाई वसंत विहार, ओवळा, ब्रह्मांड बाळकुम, मानपाडा, राबोडी, वृंदावन पाचपखाडी, नौपाडा, कळवा पूर्व, कळवा पश्चिम, मुंब्रा, कौसा, दिवा या 18 मंडळातून कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून सर्व नगरसेवक जिल्हा पदाधिकारी मंडळ अध्यक्ष पॅनल प्रमुख प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख बूथ प्रमुख या सर्वांनी हिरीरीने यामध्ये सहभाग घेतला आहे । यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये सचिन पाटील राजेश मडवी समीराताई भारती त्याचप्रमाणे विक्रम भोईर हे सरचिटणीस तर तृप्ती पाटील गौरव सिंग भास्करची बैरी शेट्टी या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे । विधानसभा शहा जबाबदाऱ्या वाटून घेण्यात आलं असून त्यानुसार याचे सर्वाचे नियोजन करण्यात आले आहे नागरिकांनी फार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपापल्या ठिकाणी ज्या बस असतील त्यामधून माननीय मोदीजींचे संबोधन ऐकण्यासाठी यावे असे आवाहन भाजपा ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप दिलेले यांनी केले आहे । अशी माहिती प्रवक्ते सागर भदे यांनी दिली ।