पंतप्रधान मोदींकडून श्रीकांत शिंदेंना पुन्हा ‘भाऊ’ म्हणून हाक

  • पंतप्रधान मोदींकडून श्रीकांत शिंदेंना पुन्हा ‘भाऊ’ म्हणून हाक

  • एनडीएच्या बैठकीत मोदींच्या भाऊ हाकेचीच चर्चा ।

प्रमोद कुमार 
डोंबिवली :  महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी  जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिल्ली येथील जीएमसी बालयोगी सभागृहात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत एनडीएची बैठक पार पडली. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देत सत्कार केला. यावेळी खासदार डॉ. शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा भाऊ म्हणून हाक मारली. यानंतर खासदार डॉ. शिंदे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले. उपस्थितांमध्ये या हाकेची चर्चा मोठा वेळ रंगली होती.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनजी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) तर्फे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्यनेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  एनडीएतील घटक पक्ष म्हणून शिवसेनेचा राधाकृष्णन यांना ठाम पाठिंबा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या दिल्ली येथे एनडीएच्या विविध बैठकांचे सत्र सुरु आहे. आज सकाळी दिल्ली येथील जीएमसी बालयोगी सभागृहात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत एनडीएची बैठक पार पडली. यावेळी विविध पक्षांकडून सी. पी. राधाकृष्णन यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या वतीने खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि मंत्री प्रतापाराव जाधव यांनी शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी खासदार डॉ. शिंदे सत्कारासाठी उभे राहताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ” काय भाऊ ” म्हणून हाक मारली.
  • ऑपरेशन सिंदूरची माहिती विविध देशांमध्ये देण्यासाठी गेलेल्या एका शिष्टमंडळाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नेतृत केले होते. यावेळी त्यांना शिष्टमंडळातील इतर सहकारी खासदारांकडून त्यांना भाऊ म्हणून संबोधित केले जायचे. यानंतर सर्व शिष्टमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भाऊ म्हणून संबोधले होते. यानंतर आज पुन्हा एकदा पंतप्रधानांकडून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भाऊ म्हणून संबोधल्याने संपूर्ण संसदेत हा चर्चेचा विषय ठरत आहे ।