- कल्याण मध्ये १५ ऑगस्टला मास विक्री बंदीवरून राजकीय गदारोळ ।

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेने १५ ऑगस्ट रोजी मास विक्री बंदीचा निर्णय घेतल्याने राजकीय वादंग पेटला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र टीका करत हा निर्णय लोकांच्या हक्कावर गदा आणणारा असल्याचे म्हटले, त्यांनी याची तुलना उत्तर कोरियातील हुकूमशाहीची केली. जय मल्हार उपहारगृहात झालेल्या एका कार्यक्रमात आव्हाड यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर सडकून टीका केली.संपूर्ण राज्यात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या या घेतलेल्या निर्णयावर आग पाखड केली जात आहे । ” १५ ऑगस्ट हा स्वातंत्र दिन असून, कोण काय खायचे किंवा नाही हे ठरवणे हा वैयक्तिक प्रश्न आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निर्णयाला अन्यायाकारक ठरवत त्यांचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, खाटीक समाज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर संघटनांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय बाहेर निषेध आंदोलन केले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या पुढाकाराने मांसाहारी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आव्हाड यांनी भाजपावर आरोप करत, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त हे त्यांच्या इशारावर काम करत असून, अशा प्रकारचे निर्णय घेत असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ,काँग्रेस अनेक पक्षाचे पदाधिकारी, महिला व युवक नेते आंदोलनात सहभागी झाले होते ।