परिमंडळ ३ कल्याण हद्दीतील श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवासाठी सुरक्षा बंदोबस्त तैनात ।

  • परिमंडळ ३ कल्याण हद्दीतील श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवासाठी सुरक्षा बंदोबस्त तैनात ।

डोंबिवली : कल्याण पोलीस परिमंडळ ३ कल्याण परिसरातील विविध पोलिस ठाणे हद्दीतील श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोकुळाष्टमी (दहीहंडी) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, या पार्श्वभूमीवर सुरक्षा बंदोबस्ताची काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे. आतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ४३ ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव, ५० ठिकाणी सार्वजनिक दहीहंडी व २०५ खासगी दहीहंडी कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये म. फुले चौक,बाजार पेठ,कोळसेवाडी,खडकपाडा, डोंबिवली,विष्णुनगर,मानपाडा व टिळकनगर पोलिस ठाणे हद्दीतील कार्यक्रमाचा समावेश आहे. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १ पो.उपनिरीक्षक , २ सहाय्यक पो.निरीक्षक,२२२ पोलिस नाईक, ७२ हवालदार, ४५७ पोलिस शिपाई, १२६ होमगार्ड तसेच एस .आर. पी. एफ  चा १ प्लॅटन तैनात करण्यात येणार आहे. पोलिस प्रशासनाकडून सर्व मंडळांना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे व नागरिकांनी शांततेत व उत्साहात उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे ।