कल्याण मधील दोन प्रमुख रस्त्यांच्या उभारणीसाठी २०१ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता !

  • कल्याण मधील दोन प्रमुख रस्त्यांच्या उभारणीसाठी २०१ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता !

  • – खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश 

  • – कल्याण पूर्वेतील चेतना नाका ते नेवाळी नाका आणि यु टाईप रस्त्याची होणार उभारणी 

प्रमोद कुमार 

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कल्याण पूर्वेतील चेतना नाका ते नेवाळी नाका रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार असून यासाठी एमएमआरडीएने १२४.८७ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली असून लवकरच रस्त्याच्या कामाची निविदा काढली जाणार आहे. तर कल्याण पूर्वेतील काटेमानिवली, सिद्धार्थनगर, तीसगाव नाका हा यू टाइप रस्ता महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाकरिता एमएमएमआरडीएने ७६.८८ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली. रस्त्याच्या कामाचीही निविदा लवकरच काढली जाणार आहे. हा रस्ता झाल्याने कल्याण पूर्वेतील वाहतुकीला अधिक गती मिळणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत आहे. कल्याण रींग रोड, मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल, खाडीवरील पूल यांसह मतदारसंघातील विविध शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या निधीतून पूर्णत्वास गेलेले सिमेंट काँक्रिटीचे रस्ते यामुळे मतदारसंघातील वाहतूक अधिक सुरळीत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या दोन रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. कल्याण पूर्वेतील चेतना नाका ते नेवाळी नाका रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरणाचा करण्यात यावा, अशी मागणी होती. या मागणीनुसार हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचा करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या सिमेंट कॉक्रिटीकरणासाठी एमएमआरडीएने १२४.८७ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली. लवकर रस्त्याच्या कामाची निविदा काढली जाणार आहे. कल्याण चेतना नाका ते नेवाळी हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. कल्याणहून हा रस्ता मलंग गडाकडे जातो, तसेच तो नेवाळी नाक्यावर अंबरनाथमध्ये काटई रस्त्याला मिळतो. या रस्त्याने खोणी तळोजाकडे, पनवेल, पुणे, नवी मुंबई, बदलापूर, कर्जतकडे जाता येते. हा रस्ता कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्व या दोन्ही विधानसभा मतदारसंघांना जोडणार आहे. हा रस्ता सिमेंटचा करण्यात यावा, अशी मागणी होती. यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला आणि रस्त्याला मंजुरी मिळाली. तसेच तर कल्याण पूर्वेतील काटेमानिवली, सिद्धार्थनगर, तीसगाव नाका हा यू टाइप रस्ता महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाकरिता एमएमएमआरडीएने ७६.८८कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली. रस्त्याच्या कामाचीही निविदा लवकरच काढली जाणार आहे. हा रस्ता झाल्याने कल्याण पूर्वेतील वाहतुकीला अधिक गती मिळणार आहे. या रस्त्यांच्या मंजुरीसाठी आणि निधीची उपलब्धता करून दिल्याबद्दल खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत ।