कल्याण पोलिस परिमंडळ – ३ विविध पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ७२ हरवलेले मोबाईल शोधून तक्रारदारांना परत फिर्यादी ,तक्रारदार मध्ये उत्साहाचे वातावरण ।

  • कल्याण पोलिस परिमंडळ – ३ विविध पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ७२ हरवलेले मोबाईल शोधून तक्रारदारांना परत फिर्यादी ,तक्रारदार मध्ये उत्साहाचे वातावरण ।

प्रमोद कुमार 

डोंबिवली : आयुक्तालय ठाणे शहर अंतर्गत परिमंडळ – ३  कल्याण विभागातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले आणि  चोरीला गेलेले एकूण ७२ मोबाईल फोन शोधून काढले असून ,त्यांची एकूण किंमत सुमारे ११ लाख १८ हजार ७८० रुपये इतकी आहे. हे मोबाईल २ जुलै २०२५ रोजी १२ वा. सुमारास खडकपाडा पोलिस ठाणे ,कल्याण पश्चिम येथे पोलिस उप आयुक्त  अतुल झेंडे आणि सहायक आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले. ही कामगिरी खडकपाडा ,बाजारपेठ,महात्मा फुले चौक आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकार झाली आहे. सन २०२४ आणि २०२५ मध्ये या हद्दीत नागरिकांचे मोबाईल हरवल्याच्या किंवा चोरीच्या अनेक तक्राळी प्राप्त झाल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार ,विशेष पथके तयार करून CEIR पोर्टलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषणाव्दारे हे मोबाईल शोधण्यात आले.मोबाईल हस्तगत करण्यात आलेल्या ठाण्यानुसार खडकपाडा पोलिस ठाणे – २५ मोबाईल किंमत ६,२२,००० महात्मा फुले चौक पोलीस ठाणे – २५ मोबाईल किंमत १,२३,००० बाजारपेठ पोलिस ठाणे  – ७ मोबाईल किंमत १,०५,००० कोळसेवाडी पोलीस ठाणे  – १५ मोबाईल किंमत २,६८,७८० तपशील असून,ही संपूर्ण मोहीम  अप्पर पोलिस आयुक्त संजय जाधव,पोलिस उपआयुक्त  अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून,हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले आहे ।