अहमदाबाद लंडन विमान कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत डोंबिवली ची क्रू मेंबर मृत्युमुखी ।

  • अहमदाबाद लंडन विमान कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत डोंबिवली ची क्रू मेंबर मृत्युमुखी ।

डोंबिवली : अहमदाबाद लंडन विमान कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये डोंबिवलीकर रोशनी राजेंद्र सोनघरे हिचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. रोशनी ही डोंबिवली पूर्व येथील राजाजी पथ येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळत आहे. तिच्या निवासस्थानी राजकीय नेत्यांनी सांत्वन करण्यासाठी गर्दी केली । आज दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदातच कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये विमानातील सर्व प्रवासी मृत्युमुखी पडल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामध्ये या एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या रोशनी सोनघरे हिचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रोशनीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ती राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.