कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नव्या “चेन्नई पॅटर्न” करवाढीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने केडीएमसी मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात ।

  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नव्या “चेन्नई पॅटर्न” करवाढीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने केडीएमसी मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात ।

प्रमोद कुमार 
कल्याण : आज कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नव्या “चेन्नई पॅटर्न” करवाढीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने केडीएमसी मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व कल्याण जिल्हाप्रमुख श्री. दीपेश पुंडलीक म्हात्रे यांनी केलं असून, त्यांना उबाठा उपनेते मा. गुरुनाथ खोत साहेब, अल्ताफभाई शेख, विजय (बंड्या) साळवी साहेब, साईनाथ तारे साहेब, तसेच जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, संघटक तात्या माने, महिला जिल्हा संघटिका वैशालीताई दरेकर यांसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा ठाम पाठिंबा लाभला. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करण्यात आली आणि शहर कार्यालयातून हजारोंच्या उपस्थितीत केडीएमसी मुख्यालयावर निदर्शने करण्यात आली. आयुक्तांकडे स्पष्ट मागणी – सामान्य जनतेवर अन्यायकारक आर्थिक बोजा टाकू नका! केंद्र वा राज्य शासनाकडून निधी घेऊनच आर्थिक भार सोडवावा, अन्यथा हा कर रद्द करा! आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच बैठक घेण्याचे आणि निर्णय पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनाच्या यशस्वी आयोजनात मोलाचा सहभाग असलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेचे मनःपूर्वक आभार। शिवसेना सामान्य जनतेच्या पाठीशी उभी आहे आणि लढत राहणार आहे!